About Us

We are a team of professionals and domain experts with deep interest in the Indian culture.We firmly believe that religion and rituals can be approached in a very organized and logical manner thus effortlessly blending with today’s hectic schedules without compromising on the Dharmic karma.

​Through oPandit.com, we would help you conduct all Dharmic Vidhi in your home and office in the most convenient way. By choosing us, you can perform all Dharmic Vidhi in a very thorough manner from expert pandits.

We are committed to organise hassle free Vidhi which would give you a divine experience along with the complete satisfaction of performing the rituals.

So if you have the Shraddha to perform a Dharmic Vidhi, it is time to contact us!

Various

Article for the Month

श्रीगणेशाय नमः | श्रीगुरुभ्यो नमः | श्रीसरस्वत्यै नमः |

भारतात अनेक धर्माचे, पंथाचे भाविक, उपासक आहेत. त्यातील सगळ्यात थोर असा म्हणजे वैदिक हिंदु आर्य सनातन धर्म. आपल्या धर्मातील उपासनेमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी आहेत आणि देवतांची षोडशोपचाराने किंवा पंचोपचाराने पूजा केली जाते. पूजेसाठी हळद, कुंकू, धूप, कापूर अशी पूजेची सामग्री आपण वापरतो. मागील काही वर्षात प्रत्येक ठिकाणी प्रदूषण व भेसळ आली आहे तशीच आपण वापरणाऱ्या पूजा सामग्रीमध्ये पण आलीच आहे. आणि म्हणूनच आपण आता शुद्धतेचा आग्रह धरणे अतिशय आवश्यक झाले आहे.

नैसर्गिक धूप

बांबू जाळणे हे आपल्या शास्त्राने निषिद्ध मानले आहे. बांबू जाळल्याने वंश खंडण होते असे आपले पुरातन ग्रंथ मानतात. उदबत्ती किंवा अगरबत्तीमध्ये बांबू वापरलाच जातो आणि इतर सुगंध सुद्धा निव्वळ केमिकल्स असतात. बांबूविरहीत उदबत्ती असली तरी लाकूड टिकावे म्हणून बऱ्याचवेळेला त्यावर कीटकनाशके मारलेली असतात. असे सर्व फुफूसाना हानी करणारे असतात व अस्थमा, दमा, ऍलर्जी सारखे विकार बळावतात. ह्यावर उत्तम उपाय म्हणजे धूप वापरणे. देशी गायीच्या शेणापासून बनलेले, नैसर्गिक सुगंध असलेले धूप, आजूबाजूचे वातावरण पवित्र करतात. डास व इतर कीटक दूर पळतात. ओपंडित मधून विकल्या जाणाऱ्या धुपामध्ये शून्य केमिकल असल्याने त्याचे भस्म (म्हणजे राहिलेली राख) बहुउपयोगी आहे. धूप जळून राहिलेले भस्म आपण चांदीची भांडी घासायला, देवांना उजळवायला वापरू शकतो. देवतांना भस्म स्नान तर अतिशय प्रिय. ही राख उत्तम दंतमंजन आहे. थोडे सैंधव मीठ मिसळून नियमित दात घासल्यास दात निरोगी होतात. भस्म किंवा धुपाची पूड तुमच्या झाडांना उत्तम खत म्हणून वापरता येईल. पित्त झाल्यास, तापाने तोंड कडू झाल्यास साध्या पाण्याबरोबर पोटात घेतल्याने त्रास कमी होतो. घसा खूप खवखवत असेल तर मधात मिसळून लहान मुलांनाही चाटवू शकतो.
आपल्या पूर्वजांनी अतिशय अभ्यास करून देवपूजेत “धुपम् आघ्रापयामि |” असाच मंत्र ठेवला आहे.

भीमसेनी कापुर

प्रत्येक पूजेत व धूपारतीमध्ये वापरला जाणारा कापूर. यज्ञ करताना, अग्निहोत्र करताना, अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये कापूर वापरला जातो. ह्या कापरातही प्रचंड भेसळ आली आहे.
आपल्याला बाजारात मिळणारे पिठूळ, पांढरे शुभ्र गोल किंवा आयताकृती आकाराचे, पारदर्शक नसलेले आणि अतिशय स्वस्त असलेले कापूर म्हणजे मेण, फॉस्फरस अशा घातक रसायनांचे मिश्रण. पोटात हा कापुर गेला तर विषारी. मेण आणि केमिकल्स जाळून हवेचे प्रदूषण होते ते वेगळेच.
म्हणूनच आपल्या पूर्वजांना अपेक्षित असलेला, औषधी गुणधर्म असलेला कापूर म्हणजे भीमसेनी कापूर, खरा कापूर. हा कापूर एका ठराविक आकारात बनवताच येत नाही. काच फुटते तेव्हा जसे वेड्यावाकड्या आकारात तुकडे होतात तसा हा कापूर दिसतो. पारदर्शक असतो. जाळल्यावर पूर्णपणे जळून जातो. कमी पुरतो.
काय आहेत कापराचे औषधी उपयोग? कापूर हुंगल्याने फुफुसांची प्राणवायु घेण्याची क्षमता वाढते. हाताने चटकन पूड करून वाफ घेताना पाण्यात घातली तर सर्दी आणि कफ कमी होतो. घरात कापुर जाळून घरभर फिरवल्याने घरातील वाईट शक्ती पळून जातात. घर आणि आपले आभामंडळ शुद्ध होते. कपाटात, पलंगात कापराची वडी ठेवली तर आपल्याला कृत्रिम रूम फ्रेशनर वापरण्याची गरजच नाही. भीमसेनी कापूर पोटातही घेता येतो. पण त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे अतिशय आवश्यक आहे.

कुंकू

सौभाग्यदायक, प्रत्येक पूजेत अत्यंत महत्त्वाचे असे कुंकू! आपल्या आज्ञाचक्राला active ठेवणारे, तेज प्रदान करणारे कुंकू. सध्या आपल्याकडे जागोजागी, कुंकू म्हणून रंगच खपवाला जातो. तो रंग लावल्याने त्वचेच्या आजारांपासून ते कॅन्सर पर्यंत अनेक रोगांना आपण निमंत्रण देतो.
खरे कुंकू कसे ओळखायचे? डोळे बंद करून वास घेतला की हळदीचा वास येतो व हाताला ओले कुंकू लावून नंतर हात धुतला की बोट लाल रंगीत न होता स्वच्छ झाले पाहिजे म्हणजे कुंकू खरे.

मधली अनेक वर्षे धर्मग्लानी ची गेली. पण आपण आता सावध होऊन, आपल्या मूळ शास्त्राप्रमाणे गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. रामदास स्वामींनी म्हणले आहे तसे – “तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, तदा संकटी देव धावून येई”… जय जय रघुवीर समर्थ!

शुभं भवतु |

मृदुला बर्वे, ओपंडित(डॉट)कॉम संस्थापक,
+91-9167968204
विले पार्ले पूर्व,
मुंबई

Our

भीमसेनी कापुर

नैसर्गिक धूप

कुंकू

We Are Social

Share on facebook
Share on whatsapp

Contact Us

Book a Vidhi at: +91-9167968204

 

Write to us at: mrudula.barve@oPandit.com

 

 

Picture Courtesy : Google

Back To ParleBazaar