नमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंड क्षेत्राची वाटचाल”. भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्री (Indian Mutual Fund Industry ) ची सुरुवात १९६३ मध्ये यू.टी.आई. (UTI )च्या स्थापनेपासून झाली त्यात भारत सरकार व आर.बी.आई (RBI )ने पुढाकार घेतला होता. म्युच्युअल फंड ची वाटचाल साधारण ४ भागात विभागली जाते. १९६३ ते १९८७ ह्या काळात फक्त यू.टी.आई. हि म्युच्युअल फंड बाजारात होती, युनिट ६४ हि योजना चांगलीच नावाजलेली होती. १९८७ च्या शेवटी साधारण रु.६,७०० करोडची मालमत्ता यू.टी.आई. सांभाळत होती. त्या नंतर चा भाग हा १९८८ ते १९९३ चा काळ, ह्या काळात एस.बी.आई , एल.आई.सी. व इतर पब्लिक सेक्टर संस्थांनी आपले म्युच्युअल फंड चालू केले. १९९३ मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्री ची मालमत्ता साधारण रु.४७,००० करोड होती. तिसरा भाग १९९३ तो २००३ चा काळ, ह्या काळात प्रायव्हेट सेक्टर म्युच्युअल फंडांनी आपले फंड चालू केले. त्या काळात लोकांमध्ये असलेल्या आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे म्युच्युअल फंड इंडस्ट्री ची वाढ धीम्या गतीनेच होत होती.
२००३ मध्ये म्युच्युअल फंडाची मालमत्ता साधारण रु.१,२२,००० करोड होती. चवथा महत्वाचा भाग म्हणजे २००३ साला नंतर चा भाग. २००३ साली यू.टी.आई. ची दोन भागात विभागणी झाली, ज्या जुन्या योजना होत्या त्या एका भाग मध्ये प्रशासक नेमून बाजूला केल्या गेल्या आणि बाकीच्या योजना इतर म्युच्युअल फंडाप्रमाणे सेबी च्या नियंत्रणाखाली आणल्या. बरेच विदेशी म्युच्युअल फंड सुद्धा भारतात आले. त्यापैकी काहींनी आपला व्यवसाय वाढवला. तर काही विदेशी कंपन्या आपला म्युच्युअल फंड इतर म्युच्युअल फंडाकडे सोपवून निघून गेले. म्युच्युअल फंड चा व्यवसाय जो २०१० साली साधारण रु.७,५०,००० करोड होता, तो आता वाढून फेब्रुवारी २०२२ साली ३८,00,000 लाख करोड पार झाला आहे. म्युच्युअल फंडाची जी असोशिएशन आहे ज्याला अँफी (AMFI ) म्हणतात, त्यांनी सर्व म्युच्युअल फंडांसाठी वेळोवेळी सर्वोत्तम कार्य मार्गदर्शक तत्त्वे ( Best Practices Guidelines ) आणून म्युच्युअल फंड चा कारभार गुंतवणूकदारांसाठी सुखकर केला. तसेच सर्व म्युच्युअल फंडाच्या मदतीने जास्तीत जास्त गुंतवणूक मागदर्शन मेळावे भरवून आर्थिक साक्षारतेसाठी खूप काम केले.
त्याचा परिणाम हा आज म्युच्युअल फंड सर्व पसंतीचा गुंतवणूक पर्याय झालेला आहे.
# म्युच्युअल फंडाचे शैक्षणिक विडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel शी जोडले जा.
# म्युच्युअल फंड बाबत नियमित माहिती मिळवण्याकरिता आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा.
# मोफत मार्गदर्शनासाठी ९३२४५४३८३२ क्रमांकावर व्हाट्स अँप माध्यमाशी जोडले जा.
# म्युच्युअल फंड संबंधित २० लेख असलेली माहिती पुस्तिका मोफत मिळवण्याकरिता आपला पत्ता आम्हाला व्हाट्स अँप करा.
# आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.
# आमच्या वेबसाईट www.nileshtawde.com वर रजिस्टर करा आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करा फक्त १० मिनिटात.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजार जोखिमेचा अधीन असते. योजने संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
म्युच्युअल फंड सही है.
धन्यवाद

Ananta is one of the many names of Lord Vishnu and it means Limitless or Infinite.
The Shankh which represents Lord Vishnu is depicted as the ‘Jyoti’ of a mud lamp or a Diya. A simple lamp can illuminate the entire room and can lighten up numerous other lamps. In the same way, a teacher can lighten up the minds of infinite number of students with their flame of knowledge.
एक दीये से लाखों दीये |
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस: परमुच्यते |
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ||
He is the source of light in all luminaries, and is entirely beyond the darkness of ignorance. He is knowledge, the object of knowledge, and the goal of knowledge. He dwells within the hearts of all living beings.
Bhagavad Gita Chapter 13, Verse 18