Up Coming  Events & Plays (Natak-Cinema) in Vile Parle

JUHU SCHEME SARBOJANEEN DURGOTSAV-2024 is Organised by Juhu Sarbojaneen Durgotsav Committee, Movie Magic Entertainment Pvt Ltd and its associates namely Jai Sai Jewellers, Royal Heritage group, Lym Technologies, Techtry Digital Media Technology, Anjali Travels & Tours, Sohani & Associates, Global Outdoors, Aamhi Parlekar. The festival is celebrated to welcome Goddess Durga. Predominantly a durga puja the festival is celebrated by all the communities with great pomp & honor. Thousands of devotees throng everyday to get a glimpse of the beautifully decorated Pandals & stalls. The festival is celebrated for 5 days from 8th of October -12th October 2024 when the idol of Goddess Durga is immersed in the sea. The 5 day festival has Songs Dance & Live Music besides the various eateries that the festival has to offer like sweets & other sweet dishes.

मंडळी ,
सस्नेह सप्रेम नमस्कार !
प्रचार शाखेने संस्थेचे सर्व विद्यमान कार्यकर्ते – सभासद, सभासदांसमवेत येणारे पाहुणे तसेच बिगर सभासद या सर्वांसाठी रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी सकाळी ११ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये अष्टविनायक निर्मित ‘ मर्डरवाले कुलकर्णी ‘ या सध्या तुफान गर्दी खेचणाऱ्या धमाल विनोदी नाटकाचा जाहीर प्रयोग आयोजित केला आहे.

लोकमान्य सेवा संघ / टिळक मंदिर संस्थेच्या सर्व विद्यमान सभासदांसाठी प्रत्येकी रु. २०० /-
संस्थेच्या सभासदांसमवेत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रत्येकी रु. ३०० /- या सवलत दरात तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

संस्थेच्या सर्व विद्यमान सभासदांनी आपली तिकिटे संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन घेऊन जाणे महत्वाचे आहे. सर्व सभासदांनी तिकिटे घेण्यासाठी येताना संस्थेने दिलेले
सभासद फोटो आय कार्ड आणणे सक्तीचे राहील. सभासद फोटो आय कार्ड दाखवल्याशिवाय कोणालाही तिकीट मिळणार नाही.
फोन किंवा मोबाईल कॉलवरून कोणतेही बुकिंग घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

दि. १ सप्टेंबर २०२४ पासून लोकमान्य सेवा संघ / टिळक मंदिर संस्थेच्या कार्यालयात नाटकाच्या बुकिंग प्लॅनसह प्रयोगाची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होतील.

तिकीट विक्रीच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
सोमवार ते शनिवार – सकाळी ११ ते संध्याकाळी ७
रविवार – सकाळी ९ ते दुपारी १२

तर जरूर भेटूया , रविवार दि. दि. २९ सप्टेंबर २०२४ या दिवशी सकाळी ११ वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात.

आपले नम्र –
आलोक हर्डीकर – अध्यक्ष , प्रचार शाखा
संगीता साने / अनीश दाते – कार्यवाह, प्रचार शाखा

डॉ. रश्मी फडणवीस / महेश काळे
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ पारले / टिळक मंदिर,
राम मंदिर रस्ता, विलेपार्ले ( पूर्व ) , मुंबई – ४००० ५७

Back To ParleBazaar