आधुनिक पारलेकर उद्योजक लेखक: अरुण फडके
लेख क्र ४, जून,२०२२
सौ.निमिषा लिमये करंदीकर – इन्फ्लुएन्सर मॅनेजमेंट…!
तिसऱ्या सहस्त्रकाची अर्थात एकविसाव्या शतकाची पहिली पहाट जशी नव्या वर्षांची सुरुवात होती तशीच नव्या प्रगतीची – नव्या संकल्पनांची – नव्या शोधांची सोबत घेऊन, ती पहाट उजाडली होती. जगभरातील नागरिकांनी आणि देशोदेशीच्या प्रचलित सरकारांनी, जागतिकीकरण व्यवस्थेचे महत्व ओळखून, तिचा स्वीकार केला होता. प्रत्येक देशाने आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेला जोडण्याचे महत्व जाणले होते. संपूर्ण जग एक मुक्त बाजारपेठ होण्याची ती सुरुवात होती. भारतीय तरुण-तरुणींनी यातिल नव्या संधी नेमक्या हेरल्या होत्या.
महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आवश्यक असलेली परस्पर संवादाची सुविधा, डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वेगवान प्रगतीमुळे उपलब्ध झाली होती. वेबसाईट – ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवस्था – मल्टिमिडीया – स्मार्टफोन – डिजिटल टेलीव्हीजन – व्हिडिओ स्ट्रिमिंग – ई बुक्स – डिजिटल म्युझिक – जिओलोकेशन या डिजिटल तंत्रज्ञानातील निवडक सुविधा आता आपली गरज बनली आहे. आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन घरगुती आणि व्यवसायाच्या कारभारात, बौद्धिक आणि भावनिक संतुलनासाठी आपल्या नकळत अविभाज्य अंग बनली आहे. आज वर्ष २०२२ मधे या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग विस्मयकारक आहे. Fifth Generation Broadband Cellular Network म्हणजे 5G चा प्रत्यक्ष वापर, आपल्या देशांत सुरू झाला आहे.
विसाव्या शतकाच्या अखेरच्या पिढीत जन्माला आलेल्या मुलांची, समाजशास्त्रज्ञांनी वर्गवारी केली, जन्मवर्षानुसार त्या मुलांना विशिष्ट नावे दिली. वर्ष १९८० आणि वर्ष १९९५ या कालखंडात जन्माला आलेल्या मुलांना त्यांनी Millennial’s Generation किंवा Generation Y किंवा Gen Y असे संबोधित केले. इंटरनेटच्या प्रभावाखाली वाढलेली Global Generation हे या नामाभिधानांचे कारण होते. इंटरनेट – मोबाइल उपकरणे – सोशल मीडिया या तंत्राचा वापर करण्यात ही पिढी कुमार वयातच वाकबगार झाली आहे म्हणून त्यांना Digital Natives असेही संबोधित केले जाते. अशीच वर्ष १९८७ मध्ये जन्माला आलेली, Millennial’s Generation मधली मिस निमिषा लिमये म्हणजे आत्ताची सौ निमिषा सर्वेश करंदीकर, आजच्या लेखातील विलेपारल्यातील आधुनिक उद्योजक नायिका आहे.

< निमिषा लिमये करंदीकर
सामान्यतः या लेखमालेत, विलेपारल्यातील कुटुंबातील पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजकांचा परिचय करून देण्याची योजना आहे. निमिषाची गोष्ट मात्र थोडीशी वेगळी आहे. निमिषा तिसऱ्या पिढीतील प्रगतिशील उद्योजक आहे. विशेष म्हणजे Consumer Product Marketing हा या तीन पिढ्यांच्या व्यवसायाचा प्राथमिक परिचय आहे. आजोबा श्री प्रभाकर त्रिंबक लिमये, एअर इंडियात नोकरी करत असंत आणि लिमये सेल्स एनहॅन्सर्स या नावाने Consumer Product Stockiest चा व्यवसाय करत असंत. Business to Consumer म्हणजे शहराच्या एका ठराविक विभागातील दुकानांना, ग्राहकांच्या दैनंदिन उपयोगाची उत्पादने पुरवठा करण्याचा व्यवसाय. विशेषतः वेगवेगळ्या उत्पादकांच्या वेफरची, खाण्याच्या पदार्थांची, मासल्यांची लहान – मोठी पाकिटे, तेल आणि साबण अशी उत्पादने यांत समाविष्ट होती. निमिषाचे वडील श्री महेश लिमयेसुद्धा एअर इंडियात नोकरी करत होते. नोकरी करत असतांना, वडिलांच्या पश्चात त्यांनी हा व्यवसाय सांभाळला होता.
वर्ष २००३ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वर्ष २००५ मध्ये निमिषा विज्ञान शाखेत बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. Millennial’s Generation ची प्रतिनिधि असलेली निमिषा अगदी तरुण वयांतच डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वेगवान अविष्कारांनी प्रभावित झाली होती. विशेषतः मल्टिमिडीया, वर्तमानपत्रे आणि दूरदर्शनच्या बातम्या, यातील जाहिरातींचे माध्यम असे तिच्या आकर्षणाचे विषय होते. बारावीनंतर पुढे काय याचा विचार करंत असतांना, या निसर्गदत्त Aptitude वर मल्टिमिडीयाच्या आकर्षणाचा प्रभाव होता, तोच तिचा स्वाभाविक कल होता. त्याचवेळी काही महाविद्यालयात BMM अर्थात Batcher of Mass Media हा पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरू झाला होता. बारावी नंतर निमिषाने या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
तीन वर्षांच्या या पदवी अभ्यासक्रमात शेवटच्या वर्षांत, Advertising आणि Journalism असे दोन पर्याय अभ्यासासाठी उपलब्ध असतात त्यापैकी निमिषाने Advertising हा पर्याय निवडला होता. या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर निमिषाने IES च्या EMDI.. .. Event Management Development Institute मध्ये एक वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. यामध्ये creative writing – public relation – marketing – soft skills – Communication Techniques या विषयांचा विशेष अभ्यास झाला. अभ्यासक्रमाच्या अखेरच्या दोन महिन्यांत, Lintas या प्रख्यात जाहिरात कंपनीच्या Lin Opinion या Public Relation Management Company मध्ये तिला Internship करण्याची संधी मिळाली होती. रोज विविध भाषिक वर्तमापत्रे वाचणे, कुठला लेखक-कुठल्या उत्पादनावर-कुठे लिहितोय-कसं लिहितोय त्यांची नोंद ठेवणे, असे या क्षेत्रातील अभ्यासाचे अनुभव मिळाले होते. Reliance च्या तीन दिवसाच्या MAMI Film Festival च्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात मनोरंजन क्षेत्राच्या व्यवहाराचा अनुभव मिळाला होता. शिक्षण पूर्ण होऊन इथून पुढे, निमिषाच्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती.
आपण काय करतोय याची निमिषा आणि तिच्या कुटुंबीयांना निश्चित जाणीव होती मात्र तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमचा, Public Relation Management या व्यवसायाचा योग्य परिचय नसल्यामुळे, ती नक्की कुठल्या दिशेने प्रगती करते आहे याचा स्नेही-सुहृदांना वेध घेता येत नव्हता. डिजिटल टेक्नॉलॉजीच्या वेगाने झालेल्या प्रगतीमुळे, मार्केटिंग आणि ऍडव्हरटायझींग क्षेत्रात निर्माण झालेल्या PR च्या नविन संधी होत्या हे याचे कारण आहे.
Public Relation Management अर्थात PR म्हणजे आपल्या ब्रॅंडचा आणि त्याच्या उत्पादनाचा परिचय ग्राहकांना करून देणे. मग हा ब्रॅंड आणि त्याचे उत्पादन कपड्यांचे – दागिन्यांचे – खाद्यपदार्थांचे – चोकॉलेटचे – परफ्यूमचे अथवा पादत्राणांचे असे कुठलेही असू शकते. यशस्वी खेळाडू – अभिनेते – अभिनेत्री – यशस्वी उद्योजक अशा व्यक्तींना सतत प्रसिद्धित ठेवण्याचे कामही अशा PR Agency करतात. अलीकडे एखादा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची प्रसिद्धी आणि त्यांचे प्रमोशन मोठ्याप्रमाणात केले जाते.

< निमिषा लिमये करंदीकर
दोन महिन्यांची Internship पूर्ण झाल्यानंतर वर्ष २००९ मध्ये निमिषाची, Clea Public Relations या नामवंत आणि सर्वात जुन्या PR Agency मध्ये नोकरीसाठी निवड झाली. जेम्स ज्वेलरी – फॅशन इंडस्ट्री – फॅशन शो – महिलांची सौन्दर्य प्रसाधने – लाईफ स्टाइल – हॉस्पिटॅलीटी इंडस्ट्री अशा विविध उद्योगांच्यासाठी PR चे काम करण्याचा संपन्न करणारा सात वर्षांचा अनुभव निमिषाला इथे मिळाला. वर्ष २०१५ मध्ये निमिषा PR PUNDIT या PR Agency मध्ये दाखल झाली.
वर्ष २०१५ – १६ या दरम्यान YouTube, Instagram, Twitter, WA या Communication App चा जागतिक स्तरावरील प्रभाव खूपच वाढला होता. प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनवर याचा वापर अगदी सहज झाला होता. इथेच Blogger आणि Influencer या दोन संवाद लेखन व्यवस्थांचा उदय झाला होता. Blogger म्हणजे एक व्यक्ति अथवा समविचारी व्यक्तींचा गट, संवाद शैलीमधे काही निवडक विषयांवर नियमितपणे आपले विचार आणि अभ्यास मांडतो. यांचे ब्लॉग म्हणजे लिखाण वाचणारे वाचक त्यांना नेटवर उपलब्ध होतात. बाजारात येणाऱ्या नवीन उत्पादनापासून अर्थव्यवस्था, भांडवली बाजार, सिनेमा, नाटक, पुस्तके, पाककला, फॅशन, संगीत अशा विविध विषयांवर असे Blogger नियमित संवाद करत असतात. PR Agency अशा ब्लॉगर्सच्या माध्यमातून आपले ब्रॅंड आणि उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. असंख्य विषयात लिहिणाऱ्या यशस्वी ब्लॉगरना यासाठी मानधन दिले जाते.
या ब्लॉगर्स बरोबरच Influencers म्हणजे ग्राहकांवर प्रभाव पाडणारे लेखकही नेटवर सक्रिय असतात. विसाव्या शतकात यांना Hidden Persuaders असे संबोधित केले जात असे. मात्र यातील Influencers वाचक आणि ग्राहकांवर आपल्या लिखाणातून प्रभाव पाडतांना जास्त आक्रमक असतात. एखादे उत्पादन कसे परिपूर्ण आहे, तुम्ही ते का खरेदी करायला हवे यासाठी ग्राहकांचे मन वळवण्याचे कौशल्य या Influencers ना अनुभवाअंति प्राप्त झालेले असते. आपल्या ग्राहकाच्या उत्पादनाला वेगाने उठाव मिळण्यासाठी PR Agency अशा bloggers आणि Influencers चे सहाय्य नेहेमीच घेत असतात. याचे कारण, यांचे लिखाण, मल्टीमीडियाच्या डिजिटल माध्यमातून जगभरात वाचले जाते. यातल्या निवडक लोकप्रिय लेखकांना, दहा ते वीस लाख Followers किंवा चहाते असतात. उत्पादन अथवा सेवा याच्या प्रकारावर, यांचे नियमित व्यवस्थापन करणे हा निमिषाच्या कौशल्याचा भाग आहे. या कुशल व्यवस्थापनामुळे तिच्या व्यवसायांत वृद्धी होत असते, तिला यश मिळत असते.
आधीच्या नोकरीच्या काळांत निमिषाला PR क्षेत्रात भरपूर अनुभव मिळाला होता. India Bridal Fashion Week, India International Jewellery Week, Chivas studio, Blenders Pride Fashion Week अशा इव्हेंट साठी, NIVEA and Fiama ही सौंदर्य प्रसाधने, French Connection, The Collective, Designer Raghavendra Rathore, Adidas अशा फॅशन ब्रॅंड साठी आणि Christian Dior beauty, American Eagle, Luxottica sunglasses, Guess watches अशा आंतरराष्ट्रीय ब्रॅंडस साठी काम करण्याचा अनुभव तिला समृद्ध करून गेला आहे.
आजोबा आणि वडिलांच्या मार्केटिंग व्यवसायांत, आधुनिक तंत्राचे शिक्षण घेऊन आणि दीर्घ अनुभव घेऊन, निमिषा आता प्रगती करते आहे. वर्ष २०२१ मध्ये Pulse PR या आपल्या स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून निमिषाने PR ची कामे करायला सुरुवात केली आहे. Givenchy, Marc Jacobs, Chloe perfumes, Burberry, Davidoff perfumes हे यशस्वी परफ्यूम ब्रॅंडस, Lawman pg3 X Designer Rocky Star Collection हा डेनीम ब्रॅंड, डॉ माधुरी अगरवाल या यशस्वी डर्मीटॉलॉजिस्ट (त्वचारोग तज्ज्ञ), एक स्टेशनरी ब्रॅंड, अर्जुन खन्ना फॅशन डिझायनर, SOS (SOMETHING SUSTAINABLE) Homegrown sustainable Indian fabric brand अशी अनेक उत्पादने आणि सेवा (services) यांचे प्रिंट मीडिया आणि डिजिटल मल्टीमीडिया अशा सर्व माध्यमातून PR चे काम निमिषाने सुरू केले आहे.
नियतीने आपल्यासाठी निवडलेल्या उपजीविकेच्या दिशेने प्रवास सुरू करताना, नेमका शिक्षणक्रम निवडण्याची, अनुभव संचयाची प्रेरणा आणि ऊर्जा, या भविष्यातील उद्योजकांना विश्वनियंताच देत असतो. अर्थात यांत जिद्द – चिकाटी – प्रयत्नवाद – दूरदृष्टि – मुत्सद्देगिरी – संयम – वक्तशीर आणि नियमित व्यवहार – उत्साह – धाडस – सौजन्य – चातुर्य – विवेक आणि अर्थात विश्वासूवृत्ती अशा उद्योजकाला आवश्यक क्षमता आणि गुणवत्ता, कुटुंबाच्या संचितांमुळे, निमिषाला निसर्गदत्त प्राप्त झाल्या आहेत. तिच्या सौम्य, मृदु, ऋजु स्वभावधर्माने आणि रूपाने, तिच्या या गुणवत्तेची अनुभूति प्रथम दर्शनी होत नाही. मात्र खूप तरुण वयात, स्वतःच्या व्यवसायांत अल्पावधीत निमिषाला मिळालेले यश हेच तिच्या गुणवत्तेची सार्थ व्यक्तता आहे..!

कम्युनिकेशन इंडस्ट्री अर्थात संपर्क व्यवस्था व्यवसाय यंत्रणेच्या Exchange4media Women’s achiever awards summit या संस्थेच्या जून २०२१ महिन्यातील दुसऱ्या सत्रातील पुरस्कार सोहळ्यात, स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून अल्पावधीत त्यात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या आपल्या विलेपारल्यातील निमिषा लिमये करंदीकर या तरुण उद्योजिकेला, BEST EMERGING ENTREPRENEUR OF THE YEAR 2021, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Communication and Influencer Management या व्यवसायांत निपुण, निमिषाचे अभिनंदन आणि तिच्यासह लिमये आणि करंदीकर कुटुंबीयांना आम्ही पार्लेकर आणि पारलेकरांतर्फे अनेकानेक शुभेच्छा…!
parlebazzar.com Blog Section
Also on Face Book / Instagram / You Tube
अरुण फडके M: ७४००१७३६३७

अरुण फडके M: 7400173637
parlebazzar.com Blog Section
–००–

Nimisha great achievement. Parlekars are proud of you. तुला भेटायला नक्कीच आवडेल. तुझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
स्मिता पुराणिक
9820002416