आधुनिक पारलेकर उद्योजक
लेखमाला: संशोधन – संकलन – लेखन: अरुण फडके
एखाद्या प्रदेशाला – एखाद्या गावाला – एखाद्या शहरातील एखाद्या उपनगराला, तिथल्या पाण्याच्या, तिथल्या मातीच्या, तिथल्या समाजातील नागरिकांच्या काही गुणवत्ता, काही वैशिष्ट्य आणि कर्तुत्व यामुळे एक वलय – एक विशेष ओळख प्राप्त झालेली असते. एखाद्या गावातील पाण्यामुळे तिथल्या रसनेचे माधुर्य जगभरातील खवय्यांच्या तोंडी परीक्षेत कायमच पैकीच्यापैकी मार्क मिळवत असते. एखाद्या गावातील शेतकी उत्पादन, तिथल्या मातीच्या वैशिष्ट्यांमुळे, त्याच्या चव, स्वाद आणि दर्जासाठी असेच कीर्तिमान झालेले असते.
मुंबई महानगरीच्या हृदयावरील कौस्तुभमणी म्हणून कीर्तिमान झालेले आपले विलेपारले उपनगर तिथल्या नागरिकांची उद्यमशीलता – स्वतंत्र व्यवसायवृत्ती यासाठी ओळखले जाते. विशेषतः निसर्गदत्त उद्यमी वृत्ती – दूरदृष्टी आणि धाडस अशा भांडवलावर स्वतःचा व्यवसाय स्थापन करून त्यात यशस्वी झालेल्या, पहिल्या पिढीतल्या आधुनिक उद्योजकांचा गांव म्हणजे आपले विलेपारले उपनगर.
नामवंत साहित्यिक कै प्रा गंगाधर गाडगीळ यांचे वास्तव्य काही काळ विलेपारल्यात होते. उपनगर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन (वर्ष १९६८) बोलतांना पारलेकरांच्या अशा वैशिष्ट्यांबद्दल, गौरवोद्गार काढताना ते म्हणाले होते….. “लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले पारलेकर मूलतः उपक्रमशील आहेत. संस्था स्थापन करून ती दीर्घकाळ चालवणे पारलेकरांकडूनच शिकावे. मात्र शतकांपूर्वी पारल्यातील नागरिकांनी, उद्यमशीलतेचे धडे मुंबईकरांकडून गिरवले आणि त्यातही ते यशस्वी झाले.”
माननीय श्री बाबुराव परांजपे – युनायटेड इंकचे माननीय श्री मधुभाऊ साठ्ये आणि माननीय श्री शरदभाऊ साठ्ये हे दोन बंधु, यांनी विलेपारल्यातील उद्योगजगतात उत्तुंग आदर्श निर्माण केले आहेत. आधुनिक काळातील आपल्या पारल्यातील अशा पहिल्या पिढीतील ज्ञात आणि अज्ञात उद्योजकांचा परिचय, श्री अरुण फडके आपल्या ‘आधुनिक पारलेकर उद्योजक’ या लेखमालेत करून देणार आहेत. ‘पारलेबझार’ – parlebazzar.com या पोर्टलच्या ब्लॉग सेक्शनवर, मार्च २०२२ पासून ही मासिक लेखमाला प्रकाशित होईल.

अरुण फडके
M: ७४००१७३६३७
parlebazzar.com Blog Section
Follow us on : Facebook | Instagram | Youtube
Follow our social media handles…. & Do Like, share and Subscribe our channels 👍👍
